पतीच्या गैरहजेरीत विवाहितेच्या घरात प्रवेश

जळगाव : पती घरात नसतांना ओळखीचा फायदा घेत विवाहितेच्या घरात प्रवेश करणा-या तरुणाविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्याच्या रोझोदा येथील तरुणाविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुनी ओळख असली तरी अचानक पतीच्या गैरहजेरीत घरात मित्र आल्यामुळे विवाहिता घाबरली. माझे पती घरात नसतांना तू अचानक घरात का आला? असे म्हणत विवाहितेने त्याला जाब विचारला. यावेळी झालेल्या शाब्दिक वादावादीनंतर त्याने विवाहितेला चापटा बुक्कयांनी मारहाण केली.

या घटने प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स. पो. नि. विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here