महिलेस शिवीगाळ करणा-या विम्या अभिकर्त्यांस कारावास

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : विम्याचा हप्ता मागण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या विमा अभिकर्त्याने महिलेला अर्वाच्च शिवीगाळ करत तिचा अपमान केल्याप्रकरणी पांढरकवडा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांच्या न्यायालयाने आरोपी दीपक गणपत शेंडे यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपी दीपक शेंडे हा २१ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ९ वाजता मारेगाव येथील पीडित महिलेच्या घरी गेला. महिलेच्या पतीच्या नावाने असलेल्या विम्याच्या रकमेचा एक हजार ७०० रुपयांचा हप्ता भरण्याची त्याने जोरजोराने ओरडून मागणी केली. पीडित महिलेने घराबाहेर येत तिचा पती घरी नसल्याचे आरोपीला सांगितले. त्यानंतरही आरोपी दीपक शेंडे याने पीडितेचा अपमान करण्याच्या दृष्टीने अश्लील शिवीगाळ केली.

या घटनेप्रकरणी महिलेने मारेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी माधव गिरी यांनी गुन्ह्याच्या तपासाअंती पांढरकवडा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील ॲड रमेश मोरे यांनी एकूण तीन साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपी दीपक शेंडे यास एक वर्ष साधा करावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेतून पीडितेला सात हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय दीपक गावंडे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. गणेश धात्रक (घाटंजी) यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here