अनैतिक संबंधाच्या रागातून युवकावर प्राणघातक हल्ला

On: July 1, 2025 7:18 PM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : अनैतिक संबंधाचा राग मनात ठेवून येरंडगाव येथील एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना इंजाळा जंगल शिवारात उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी एका विरुद्ध घाटंजी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश मोलगुलवार असे जखमी युवकाचे नाव असून त्यांचे एका महिलेससोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप आहे. या आरोपातून एका युवकाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment