अज्ञात महिलेच्या खूनाने खळबळ

On: July 25, 2025 12:35 PM

जळगाव : रावेर तालुक्यातील निंभोरा येथे काल 24 जुलैच्या सकाळी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी अज्ञात संशयीताविरुद्ध निंभोरा पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत महिला ही साधरण तिस ते पस्तीस वयोगटातील आहे. गुलाबी रंगाचा पंजाबी कुर्ता आणि त्याच रंगाची लॅगीज परिधान केलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या उजव्या हाताला आणि दोन्ही पायांना दोरी बांधलेली होती. सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे पाटील पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment