सैनिक मारहाण प्रकरणी भाजपा विरुद्ध शिवसेना

मुंबई : निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याची शाई अजून वाळलेली नाही. या हल्ल्यानंतर राज्यातील वातावरण अजून तापलेले आहे. एका कार्टूनच्या मुद्द्यावरुन शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्यावर काही दिवसांपुर्वी हल्ला चढवल्याची घटना घडली होती. हाच मुद्दा लक्षात घेत शिवसेनेकडून सन 2016 चा मुद्दा बाहेर काढण्यात आला आहे. भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी एका माजी सैनिकावर हल्ला केला होता. या हल्ल्याबाबत आता राज्यातील शिवसेना सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

निवृत्त नौदल अधिका-यास मारहाणीच्या मुद्द्यावरुन भाजपाने शिवसेनेला कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न केला असतानाच, ठाकरे सरकारनेही भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिक सोनू महाजन यांना मारहाण केली होती. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे भाजपला कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सन २०१६ मधे भाजपचे तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यावेळी भाजपचे सरकार होते. त्यामुळे उन्मेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. त्यानंतर सन २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई सरकली नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here