आपल्या सोन्यावरही असेल मोदी सरकारची नजर

कोरोनामुळे देशावरील आर्थिक ओझे वाढतच आहे. आर्थिक विकासासाठी चालना देण्यासाठी व सध्याच्या वाढीव खर्चाची पूर्तता करण्यासाठी सरकार विविध युक्त्या व क्लुप्त्या लढवत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अंशकालीन सदस्य निलेश शाह व स्टेट बँक म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी नवनीत मुनोत यांनी असाच एक सल्ला सरकारला दिला आहे. निलेश शाह यांच्याकडून भारतीयांकडे उपलब्ध असलेले सोने वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.

25,000 टन सोने भारतीयांनी आपल्याजवळ ठेवले असावे असा एक अंदाज वर्तवला जात आहे. त्या अंदाजानुसार एक योजना आणली जाऊ शकते. त्या योजनेतून किमान दहा टक्के सोने काढता येईल. त्यातून 50 अब्ज कर रुपात व प्राप्त होतील तसेच 150 अब्ज डॉलर्स गुंतवणूक व खर्चासाठी उपलब्ध असेल.

शहा आणि मुनोत म्हणाले की, रोख रकमेची उपलब्धता शेअर बाजारात सध्याच्या तेजीचे कारण आहे. सन 2015 या काळात केंद्र सरकारची ‘गोल्ड कमाई योजना’ सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत घरात असलेले सोने जमा करण्याचा पर्याय त्यावेळी देण्यात आला होता. मात्र कमी उत्पन्न व सुरक्षेच्या चिंतेमुळे या योजनेला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. या योजनेच्या अंतर्गत बँक ग्राहकांना निश्चित कालावधीसाठी सोने जमा करण्यासाठी परवानगी देते. यावरील व्याज 2.25 टक्के ते 2.50 टक्के असते. या योजनेच्या अंतर्गत 995 शुद्ध सोन्यापैकी किमान 30 ग्रॅम बँकेत जमा करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here