जळगाव : रामानंद नगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस कलकत्ता येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून अपहार करण्यात आलेल्या मुद्देमालापैकी 11 लाख 90 हजार रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी फरार आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आली असून हा गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आला होता.
सन 2017 मधे सचिन वसंतराव भामरे यांच्या पिंप्राळा येथील सोन्या चांदीच्या दुकानातून कारागीर सुशांत कंडू याने 30 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार करुन पलायन केले होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि भुषण कोते यांच्यासह हे कॉ जितेंद्र राजपुत, पोलीस नाईक योगेश बारी, पो कॉ पिनल सोननी, दीपक वंजारी आदींनी पुर्ण केला.





