पुतण्याचे अपहरण करणारा काका अटकेत 

On: January 11, 2026 8:11 AM

जळगाव : पंचवीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी चुलत काकानेच पुतण्याचे अपहरण घडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ माजली आहे. यावल पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी वैभव घनश्याम बेंडाळे (जळगाव) यास अटक केली असून त्याचा अपहरणकर्ता साथीदार मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. सचिन गुरुदास पाटील-माळी असे फरार साथीदाराचे नाव आहे. 

यावल येथील महाजन गल्लीतून आदित्य नरेंद्र बेंडाळे या सहा वर्षाच्या बालकाचे अपहरण झाले होते. शुक्रवारी 9 जानेवारीच्या सायंकाळी आदित्य हा महाजन गल्ली परिसरात खेळत होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या सचिन माळी याने त्याचे अपहरण केले होते. वाटेत दुचाकी मध्ये पेट्रोल भरत असताना तो आणि अपहरण झालेला बालक असे दोघेही सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. वैभव बेंडाळे आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्याने पुतण्याचे अपहरण केल्याचा कट उघडकीस आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment