विनापरवाना गावठी पिस्तुलासह आरोपी ताब्यात

जळगाव : विना परवाना गावठी पिस्तूलासह तीन जिवंत काडतूस, धारदार शस्त्रासह आरोपीस जळगाव शहरातील बळीराम पेठ भागातून आज अटक करण्यात आली. अटकेतील आरोपीविरोधात जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ व जळगाव शहर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत बळीराम पेठ भागातील रहिवासी असलेला संशयित आरोपी विलास मुधकर लोट (४०) यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. अरुण निकम यांनी शहर व शनीपेठ पोलिस पथकाच्या मदतीने ही कारवाई सायंकाळी केली.

अटकेतील संशयित आरोपी विलास लोट याच्या घराची तपासणी केली असता ५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, १ हजार ५०० रुपये किंमतीचे जिवंत काडतूस, ५०० रुपये किंमतीचा कोयता आणि प्रत्येकी १ हजार रुपये किंमतीच्यादोन गुप्त्या असा मुद्देमाल आढळून आला. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी संशयित आरोपी विलास लोट याच्या अटकेप्रकरणी शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ महेंद्र पाटील, गणेश पाटील, किरण पाटील, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंदाटे, ओमप्रकाश पंचलिंग व महिला पोलीस शिपाई अलका मोरे तसेच शनी पेठ पोलीस स्टेशनचे हे.कॉ. दिनेशसिंग पाटील, अभिजित सैंदाणे, किरण वानखेडे, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे, राहुल पाटील यांनी ही कारवाई केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here