पतीने पकडले अन मित्राने केला तिच्यावर अत्याचार

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : तरुणपणापर्यंत मुलगी आपल्या पालकांच्या बंधनात असते. विवाहानंतर ती आपल्या पतीच्या बंधनात असते. पतीरुपी कुंपनाचे तिला कायदेशीर व सामाजीक दृष्ट्या सरंक्षण असते. मात्र जळगाव शहरात एका घटनेतून समाजमन ढवळून निघाले आहे. कुंपनच शेत खायला निघाले तर दाद कुणाकडे मागावी अशी अवस्था एका विवाहितेची झाली. पतीनेच पत्नीवर अत्याचार करण्यासाठी त्याच्या मित्रांना रान मोकळे करुन देण्याची घृणास्पद घटना समोर आली आहे.

काही रकमेच्या फायद्यासाठी या नराधम पतीने आपल्या पत्नीवर मित्रांकरवी अत्याचार करण्याची मोकळीक दिली. एवढ्यावरच हा मित्र थांबला नाही तर त्याने तिच्यावरील अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला व तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर पाणी डोक्यावरुन जात असल्याचे बघुन पत्नीने पती व त्याच्या मित्राविरोधात रामानंद नगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

धुळे येथील माहेरवाशीन असलेली विवाहिता लग्नानंतर जळगाव येथे पतीसोबत राहण्यास आली. लग्नानंतर या विवाहितेने दोघा मुलांना जन्म दिला. सर्व काही सुरळीत सुरु असतांना लॉकडाऊन काळात त्याचे व्यवहार ठप्प झाले.

तिच्या मित्राचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. लॉकडाऊन काळात या विवाहितेच्या पतीने मित्राच्या मदतीने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. मात्र आपण रहात असलेल्या परिसरात त्याला संकोच वाटत होता. त्यामुळे या विवाहितेच्या पतीने भाजीपाला विक्री करणा-या मित्राच्या घरात भाड्याने राहण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात मे महिन्यात हे कुटूंब त्या भाजीपाला विक्रेत्या मित्राच्या घरात भाड्याने राहण्यास गेले. त्याठिकाणी तो मित्र एकटाच रहात होता.

काही दिवसांनी त्या विवाहितेच्या पतीने तिला म्हटले की तु माझ्या मित्राच्या समोर वस्त्र बदलत जा म्हणजे आपल्या व्यवसायात वृद्धी होईल. हा प्रकार तिला अजिबात आवडला नाही. त्यावर चिडून जावून त्याने पत्नीला मारहाण केली. अखेर नाईलाजास्तव तिने त्या मित्रासमोर तसा प्रकार करण्यास सुरुवात केली.

८ जून रोजी कहरच झाला. आता त्या मित्रासोबत शैय्यासोबत कर असे त्या विवाहितेच्या पतीने तिला म्हटले. या विषयावरुन दोघा पती पत्नीत वाद सुरु झाले. त्याने तिला बळजबरी शितपेय पिण्यास दिले. त्यामुळे तिला चक्कर आले. दरम्यान पतीचा मित्र तेथे आला. त्याने तिच्यावर अत्याचार सुरु केला. पतीने तिला पकडून ठेवले व मित्राला अत्याचार करण्यास मोकळीक दिली.

दरम्यान तिची तब्येत बिघडल्यामुळे त्याने तिला 17 जुलै रोजी माहेरी सोडून दिले. तिने हा प्रकार तिच्या वहिनीच्या कानावर घातला. विवाहितेने पती व त्याच्या मित्राविरोधात रामानंद नगर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here