चोरीच्या मोटारसायकलीसह दोघे चोरटे अटकेत

On: February 3, 2026 3:50 PM

जळगाव : चोरीच्या मोटार सायकलीसह दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. आतिष जितेंद्र पोथीवाल (रा काचंन नगर जळगाव) आणि गणेश लक्ष्मण कोळी (रा. साकेगाव ता. भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.  

अजिंठा रोडवरील काशिनाथ चौक भागातून चोरी झालेल्या मोटार सायकल प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय बातमीदाराच्या मदतीने दोघा चोरट्यांची नावे निष्पन्न करण्यात आली. दोघा चोरट्यांना ताब्यात घेऊन पुढील तपास करत त्यांच्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, पो. हे.कॉ. गिरीश पाटील, पो.ना.प्रदिप चौधरी, पोकॉ गणेश ठाकरे, पो कॉ राहुल घेटे, पोकॉ योगेश घुगे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहाभाग घेतला. अधिक तपास पो.ना.प्रदिप चौधरी, पोकॉ योगेश घुगे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment