गोवंश मांस वाहतुक करणारा मुद्देमालासह जेरबंद

On: February 4, 2026 6:54 PM

जळगाव – गोवंश कत्तल केल्यानंतर ते मांस रिक्षाद्वारे वाहतुक करणा-यास मुद्देमालासह एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. शेख जमीर मेहबुब असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी जळगाव – भुसावळ दरम्यान दुरदर्शन टॉवर नजीक हा प्रकार उघडकीस आला.

सुमारे सत्तर किलो वजनाचे गो मांस हस्तगत करण्यात आले असून एमआयडीसी पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा रजि. नं. 83/2026 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5, 5 (क) 9, 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील श्रेणी पोलिस उप निरीक्षक राजेंद्र उगले यांच्यासह सफौ विजयसिंग पाटील, हे.कॉ. रामदास कुंभार, रामकृष्ण पाटील, पोहेकॉ गिरीष पाटील, पोना प्रदिप चौधरी, पोकॉ विनोद ऑस्कर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास हे.कॉ. रामदास कुंभार करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment