रेल्वे प्रवाशांच्या सामानाची चोरी करणारा जेरबंद 

On: February 9, 2026 7:08 PM

जळगाव – झेलम एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेची चोरी करणारा अट्टल चोरटा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (रा. फातेमा नगर अल्फरा मशीद जवळ जळगांव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याचा दुसरा साथीदार फरार आहे. 

दिनांक 8 फेब्रुवारी रोजी झेलम एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या सामानाची  जळगाव ते भुसावळ दरम्यान चोरी झाली होती. त्या प्रवाशाच्या बॅगेतून एक लाख 65 हजार रुपये किमतीचा सोने चांदीचा मुद्देमाल चोरी झाला होता. इटारसी रेल्वे पोलिसात याप्रकरणी शुन्य क्रमांकाने अज्ञात चोरट्या विरुद्ध नोंद झालेला गुन्हा भुसावळ रेल्वे पोलिसात वर्ग करण्यात आला होता. 

हा गुन्हा जळगाव पोलीस दप्तरी नोंद असलेला गुन्हेगार समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन व सोनू जयसिंग बागडे या दोघांनी केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समजली. यापैकी समीर शेख यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याचा फरार साथीदार सोनू बागडे याचा शोध सुरु आहे. अटकेतील समीर शेख यास रेल्वे पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाई कामी देण्यात आले आहे. 

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील  पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रविंद्र कापडणे आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment