जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

On: April 19, 2026 8:40 AM

जळगाव दि. १८ प्रतिनिधी –  जळगाव क्रिकेट लिगच्या कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन शनिवारी संध्याकाळी झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन,  जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, जळगाव महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, संचालक अतुल जैन, धुळ्याचे महापौर मायादेवी परदेशी, बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा बाफना, स्पेक्ट्रमचे  दीपक चौधरी उपस्थित होते. यावेळी जळगाव कोगटा किंग्ज संघाचे मालक अतुल कोगटा, जामनेर सातपुडा हिरोजचे किरण बच्छाव, चाळिसगा चॅलेंन्सर्ज संजय भावसार, रावेर रॉयल्स महाविर जैन, विमल जैन, अमळनेर सुहांस जायंट्सचे संदीप काबरा, पाचोरा एसकेटी योद्धाजचे  हेमंत कोठारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात अतुल जैन यांनी सन २०१९ मध्ये झालेल्या जेसीएलमधून राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर सात ते आठ खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरील पायाभूत सुविधा जैन ड्रीम स्पेसेस च्या भव्य क्रीडांगणावर केल्या गेल्याची माहिती दिली. दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांनी स्पेक्ट्रमच्या अलरीक इलेक्ट्रीक्सच्या नवीन दालनाला भेट दिली. यावेळी कंपनीचे लो व्होल्टेज, वायरिंग डिव्हाईस, स्वीच  असे  प्रोडक्ट लॉंन्च करण्यात आले. 

सुरेशदादांनी जागवल्या आठवणी – माजी मंत्री सुरेशदादा जैन हे उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होते. मैदानावर त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, मी इंदूर येथे असताना चांगला क्रिकेट खेळत होतो. माझी रणजी संघातही निवड त्यावेळी झाली होती. विद्यापीठ पातळीवर मी अनेक सामने खेळलो होतो. आता जळगावात अशोकभाऊ व अतुलभाऊ यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी चांगली संधी निर्माण केली आहे. या स्पर्धेतून राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

जळगावचे वानखेडे स्टेडियम म्हणजे जैन ड्रीम स्पेसेसचे क्रीडांगण – गिरीश महाजन – मैदान व आयोजनाबाबत अशोक जैन आणि अतुल जैन यांचे मंत्री गिरीश महाजन यांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले, मी परवाच वानखेडे स्टेडीयमवर होतो. ते मैदान पाहिले. त्यापेक्षा जळगावातील मैदान अधिक चांगले झाले आहे. यामुळे आता जळगावातून अनेक चांगले खेळाडू निर्माण होती. सुरेशदादा यांनी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील खेळाडू निर्माण होतील. पुढे बोलताना ते म्हणाले की, शालेय व महाविद्यालयीन काळात ते कुस्ती, कबड्डी आदी खेळांत सक्रिय होते; मात्र एका खेळावर लक्ष केंद्रित केले नाही. त्याचवेळी सुरेशदादा जैन यांनी गिरीश राजकारणाच्या खेळात रंगल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर महाजन पुढे म्हणाले, राजकारणाच्या खेळात मी चांगलाच रंगलो. त्यामुळेच सात वेळा सरपंच, सात वेळा आमदार आणि तीन वेळा मंत्रीपद मिळाल्याचे सांगत 

अंतीम सामनातील विजेत्याला दिली जाणाऱ्या ट्रॉफीचे अनावरण – मान्यवरांच्या उपस्थितीत जळगाव क्रिकेट लीगच्या ट्रॉफीचे दिमाखानात उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शानदार सांस्कृतिक कार्यक्रम झाले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 

पहिल्याच रोमांचकारी सामन्यात जामनेर सातुपडा हिरोज यांनी ‘अक्षय’ विजय  – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६,  JCL T-20 क्रिकेटचा रोमहर्षक संग्रामाला सुरवात झाली. जामनेर सातुपडा हिरोज् व पाचोरा एसकेटी योद्धाज मध्ये झालेल्या पहिल्याच रोमांचकारी सामन्यात जामनेर सातुपडा हिरोज यांनी ‘अक्षय’ विजय नोंदविला. मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस येथील भव्य क्रीडांगणावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लीगच्या पहिल्या सामन्याचे नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या हस्ते झाले. जामनेर सातपुडा हिरोज् संघाचे कर्णधार शतायू कुलकर्णी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलदांजांची निर्णय सार्थ ठरवत रामकृष्णा राठोड यांनी 14 निर्धाव चेंडू टाकत 3 विकेट घेतल्यात. त्याला शतायू कुलकर्णी 3 विकेट ने चांगली साथ दिली.

दोघांसह उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर पाचोरा एसकेटी योद्धाजच्या फलंदाजांना 114 रनांवर रोखले. 10 विकेटच्या बदल्यात त्यांनी धावसंख्या केली. यामध्ये 15 चेंडूमध्ये 30 धावा रोहित तलरेजा याने केले. त्याला सिद्धेश देशमूख 28 धावा (36 बॉल) याची संयमी खेळी महत्त्वपूर्ण ठरली. 115 धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजी साठी आलेल्या जामनेर सातपुडा हिरोज् च्या फलंदाजांनी आक्रमक खेळ केला. प्रध्दुम महाजन याने 14 चेंडूत 34 धावा कुठल्यात. त्याला ललित पाटील 29 धावा (25 चेंडू), नाबाद क्रिशी नाथानी 33 धावा (23 चेंडू) यांनी विजयी लक्ष्य गाठले. जामनेर 6 विकेट राखुन विजय नोंदविला. पाचोरा एसकेटी योद्धाज तर्फे निलेश पाटील, चारूदत्त नन्नवरे, आर्यन देशमूख यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रामकृष्णा राठोड याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले. याप्रसंगी किरण बच्छाव, राहुल पवार, अलरीक इलेक्ट्रीकल्स चे वरिष्ठ व्हाईस प्रेसिंटंट प्रविण कुंजीवाल, हेमंत कोठारी, प्रणव कोठारी, एस. टी. खैरनार, राजेंद्र लढ्ढा उपस्थित होते. रोहित तलरेजा व ललित पाटील यांना बेस्ट सिक्स म्हणून गौरविण्यात आले. विजयी जामनेर सातपुडा हिरोज् संघाला 15000 रोख पारितोषिक तर उपविजयी पाचोरा एसकेटी योद्धाज ला 8000 रुपये रोख पारितोषिकाने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे गौरविण्यात आले. सूत्रसंचालन विजयकुमार अय्यर यांनी केले. आज दि. १९ एप्रिलचे सामने – दुपारी ३ वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध जळगाव कोगटा किंग. सायंकाळी जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध रावेर रॉयर्ल्स.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment