जळगाव : येथील आदित्य अशोक चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी परीक्षेत ९०% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले असून तो सेंट टेरेसा स्कूल चा विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आदित्य याने नियमित अभ्यास, मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले.
शालेय जीवनातही त्याने सातत्याने गुणवत्तापूर्ण प्रगती राखली असून शालेय स्तरावरील खेळामध्ये व चित्रकला या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागसुद्धा नोंदविला. भविष्यात इंजिनिअर होण्याचे त्याचे ध्येय आहे. त्याचे वडील अशोक चौधरी हे जैन इरिगेशन या संस्थेत ग्रंथपाल असून त्याच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन तर पालक सौ. रंजना, अशोक चौधरी व आजी-आजोबा, शिक्षकवृंद, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





