दिड लाखाची लाच स्विकारतांना मानद अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

On: May 20, 2026 6:21 PM

जळगाव : अवैध सावकारीबाबत कारवाईचा अहवाल अनुकुल पाठवण्यासह तक्रारदार आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये यासाठी उप निबंधकांच्या सांगण्यावरुन दिड लाख रुपयांची लाच स्विकारणा-या जिल्हा बॅंक असोसिएशनच्या मानद कार्यकारी अधिका-यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश बाबुराव बारी (उप निबंधक) आणि देविदास धनसिंग पाटील (मानद कार्यकारी अधिकारी  जळगाव जिल्हा बॅंक असोसिएशन) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

या घटनेतील तक्रारदाराविरुद्ध अवैध सावकारी बाबत कारवाई झाली होती. लाच मागणी पाच लाख मागण्यात आली होती. तडजोडीअंती तिन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी मागणीचा पहिला हप्ता दिड लाख रुपये स्विकारण्यात आला असता कारवाईचा फास दोघांभोवती आवळला गेला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment