जळगाव दि. ५ (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये उत्साहात झाला. शुक्रवार, दि. ५ जून रोजी झालेल्या या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणाचे रक्षण, निसर्गाचे महत्त्व समजावून सांगणे आणि वाढत्या प्रदूषणाबाबत जनजागृती करणे हा होता. पन्नास वर्षांपूर्वी श्रद्धेय मोठ्या भाऊंनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत, औद्योगिक क्षेत्रात काम करताना केवळ व्यापार व नफा न पाहता पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिल्याचे अधोरेखित करण्यात आले. “सार्थक करूया जन्माचे रूप, पालटू वसुंधरेचे” या विचारातून त्यांनी झाडे, प्राणी, पाणी व हवा यांचे रक्षण करून जगाला प्रेरणा दिली.
कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात डी.आय. दसर्डा, मिलिंद खारूल, व्ही. एम. भट व डॉ. जनमेजय नेमाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी डॉ. योगेश बाफना, शुभम शुक्ला, डॉ सचिन पाटील तसेच कार्मिक विभागातील अनिल जैन, किशोर बोरसे, भरत राणे, निलेश भावसार, राहुल परदेशी, ऋषिकेश पाटील, तसेच गार्डन विभागातील सहकारी आर एस पाटील, बावीस्कर आदींनी सहभाग नोंदवला. वृक्षारोपण जनजागृती, नैसर्गिक समतोल व पाण्याचे योग्य नियोजन याचे उत्तम उदाहरण जैन हिल्स ठरले असून पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
जैन फूड पार्क येथे वृक्षपूजा व वृक्षारोपण – जैन फुड पार्क, जैन व्हॅली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावर्षी बीबीयू प्लांट परिसरात मुख्य अतिथी प्लांट हेड परींदं शिरोडकर व जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सुनील गुप्ता यांच्या हस्ते पवित्र वडाची पूजा करून वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी मनोज डोंगरे, जी. आर. पाटील, हरी शुक्ला, वाय. जे. पाटील, अस्लम देशपांडे यांच्यासह सुरक्षा अधिकारी तुकाराम बुधवंत, दिलीप वाघ, पंकज लोहार, कैलास सैंदाणे, निखिल भोळे, जितेंद्र पाटील, गिरीश, प्रशांत, गिरीराज, हेमंत पाटील व फायर सेफ्टी सहकारी उपस्थित होते.
या उपक्रमात शंभरहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी जैन फुड पार्कमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला जातो. यंदाच्या उपक्रमात सहकारी व अधिकारी यांच्या सक्रिय सहभागामुळे परिसर हिरवागार करण्यास हातभार लागला. “तंत्रज्ञानासोबत पर्यावरणाचे जतन” हा संदेश देत या वृक्षारोपणाने सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली.





