जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

On: June 17, 2026 1:12 PM

जळगाव दि. १६ प्रतिनिधी –  जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन (JDBA) आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी  निवड चाचणीचे आयोजन ३ ते ५ जुलै २०२६ यादरम्यान  करण्यात येईल. ही स्पर्धा नवी पेठ येथील जे.जे.के.एस.च्या इनडोअर बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी यांनी केले आहे. स्पर्धेत ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील गटांसह खुला व ३५ वर्षांवरील वरिष्ठ गटांचा समावेश करण्यात आला आहे. मुलं व मुली तसेच पुरुष व महिला या गटांमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूस नोंदणी करावी लागणार आहे.

प्रवेश अर्ज https://forms.gle/ziPsGAxXdyw2cFeH9   या गुगल फॉर्मद्वारे स्वीकारले जातील. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २८ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेतील प्रवेश फक्त जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील सामने जागतिक बॅडमिंटन महासंघ आणि भारतीय बॅडमिंटन संघटना यांच्या नियमांनुसार खेळविण्यात येणार आहेत. सामने सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होतील. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किशोर सिंह ९९७०४ १४९५४ किंवा ९४२११ २११०६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment