चोरीस गेलेली एक लाखाची रक्कम हस्तगत

On: July 17, 2026 6:05 PM

जळगाव : जळगाव शहरातील कालिका माता मंदीर परिसरातून दुचाकीच्या डीक्कीतील एक लाख रुपयांची रक्कम चोरीस गेल्याची घटना 13 जुलै रोजी घडली होती. या चोरीच्या घटनेचा उलगडा शनीपेठ पोलिसांनी केला असून चोरीची पुर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. चोरट्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील तपासकामी हस्तगत करण्यात आली आहे.

दिनांक 13 जुलैच्या दुपारी मेहरुण परिसरातील रहिवासी तरुण कालिका माता मंदीरानजीक त्याच्या दुचाकीन आला होता. त्यावेळी त्त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत एक लाखाची रक्कम होती. तो तरुण पाणी पुरी खाण्यासाठी गेला असता दरम्यानच्या कालावधीत हा प्रकार घडला. या घटनेचा तपास लावण्यात शनीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल व त्यांच्या सहका-यांना यश आले आहे.  

सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या मदतीने रवी जगदीश प्रजापत या चोरट्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल विचारपुस केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याने चोरीची कबुली देत चोरीची रक्कम देखील काढून दिली आहे.

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक संतोष खेडकर, पोलीस उप निरीक्षक अभिषेक कटारे, पोहेका योगेश जाधव, पोहेका विजय खैरे, पोहेका निलेश दुगो, पोहेका पराग दुसाने, पोहेका अमोल वंजारी, पोहेका गणेश ढाकणे, पोहेका योगेश साबळे यांच्यासह सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करणारे पोहेका मुबारक देशमुख आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment