जळगाव – प्रतिभा प्राथमिक विद्या मंदिर माध्यमिक ता. जि. जळगाव येथे वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था व वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव यांच्या तर्फे शून्य सर्पदंश अभियानंतर्गत सर्प विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य हेमराज संपकाळे यांनी या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात प्रतिभा प्राथमिक विद्या मंदिर चे मुख्याध्यापक बाविस्कर सर तसेच चंदनकर मॅडम व वासुदेव जोशी समाज संस्थेचे अध्यक्ष अनंत जोशी, सदस्य सागर जोशी व सदस्यानी उपस्थित सर्व विद्यार्थ्याना विषारी व बिनविषारी सापांची ओळख कशी करावी, सापाचे पर्यावरणातील महत्व, सर्पदंश झाल्यास काळजी कशी घ्यावी, प्रथमोपचार केव्हा व कसा करावा, सर्पदंशाबाबत गैरसमज तसेच समाजातील अधश्रद्धा बाबत अतिशय सोप्या व कळेल अशा पद्धतीने माहिती दिली. तसेच सापांना न मरता त्यांचे संरक्षण करण्याचे महत्व विद्यार्थ्यांना कथन केले.







