गीतांजली एक्स्प्रेसमधील प्रवाशाकडे आढळला दहा लाखांचा गांजा

On: August 18, 2026 10:29 AM

जळगाव : गीतांजली एक्स्प्रेसमधून भुसावळ रेल्वे स्टेशनवरील प्लॅट्फॉर्म क्रमांक तीन वर उतरलेल्या एका प्रवाशाच्या ताब्यातील गाठोड्यात 19 किलो 959 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाचे बाजारमुल्य सुमारे 9 लाख 97 हजार 950 रुपये असल्याचे म्हटले जात आहे. गांजा बाळगणा-या अरुण कुमार ऊर्फ सोनू (रा. चरतीपुर, पोस्ट बारा, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) या तरुणाला त्याच्या ताब्यातील गांजासह रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने अटक केली आहे. श्वानाकडूनही त्याच्य गाठोड्याची तपासणी करण्यात आली.

ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांतून गांजाची मोठ्या प्रमाण वाहतूक सुरु असल्याचे म्हटले जाते. त्या माहितीच्या आधारे या भागातून येणा-या रेल्वे गाड्यांवर आरपीएफची विशेष नजर असते. मिळालेला गांजा गुजरात राज्यात नेला जात असल्याचा आरपीएफ पथकाचा अंदाज आहे. त्याबाबतची सखोल चौकशी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment