जळगाव : भुसावळ शहरातील अठर वर्षाच्या तरुणाचे हातपाय बांधून त्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली असून या गुन्ह्यात गंभीर कलमे वाढवली आहे. पिडीत तरुणाच्या आईने या घटनेबाबत पुरवणी जवाब दिला आहे.
दि. 23 एप्रिल 2026 रोजी ही घटना घडली होती. मारहाण झालेल्या तरुणाला त्याच्या काही परिचीत तरुणांनी फोन करुन बोलावून घेतले होते. जमलेल्या इतर तरुणांनी मिळून त्याला विविध ठिकाणी नेवून त्याचे हातपाय बांधून मारहाण केली. त्याचे कपडे काढून मारहाण केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. यातील दोन संशयीत अल्पवयीन असून त्यांना बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड करत आहेत.






