इको वाहनातील मौल्यवान धातू चोरी करणाऱ्या दोघांना अटक

On: September 7, 2026 3:55 PM

जळगाव – इको वाहनाच्या सायलेन्सर मधील मौल्यवान धातू चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पारोळा पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडियम  या मौल्यवान धातुसह 6 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील चोरी करण्याच्या तयारीत असताना दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. 

यासिफ यामीन चौधरी व आरिफ सलीम अशी अटक करण्यात आलेली आलेल्या उत्तर प्रदेशातील दोघा चोरट्यांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत नाकाबंदी दरम्यान संशयास्पद स्थितीत कारसह या दोघांना चोरी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे इको वाहनाच्या सायलेन्सर मध्ये वापरले जाणारे मौल्यवान धातू देखील आढळून आले.

पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे, पीएसआय विजय बोंबे, हे. कॉ. शरद पाटील, महेश पाटील, पोलीस कर्मचारी अभिजीत पाटील, मिथुन पाटील, आकाश पाटील, तुषार सोनवणे तसेच महामार्ग पोलीस केंद्र पाळधी येथील हेड कॉन्स्टेबल हितेश पाटील, राजेंद्र ठाकूर, अनिल सपकाळ, विजय दुसाने, सुशील पाटील, संदीप पाटील आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment