जळगाव – जळगाव एमआयडीसी परिसरातील बॅटरी कंपनीतून चोरी झालेल्या शिशाच्या धातूच्या विटांसह 1 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जळगाव एमआयडीसी परिसरातील ई सेक्टर परिसरातील श्री आनंद बॅटरी कंपनीमध्ये चोरीची घटना घडली होती. या घटनेतील सहा चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आसिफ शहा सिकंदर शहा, मोहसीन शाह सिकंदर शाह, महेश उर्फ बापु संतोष भोई, मुकेश राजु परमार, शेख आबिद शेख मोहम्मद, शकील शहा रुबाब शहा अशी अटकेतील सहा जणांची नावे आहेत.
चोरीस गेलेल्या 97 हजार 500 रुपये किमतीच्या शिशाच्या धातूच्या 16 विटा तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पो.उप निरी. चंद्रकांत पुंडलीक धनके, श्रेणी पो.उप निरी. विजयसिंग पाटील, पो.हे. कॉ. गिरीश दिलीप पाटील, पो.हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, पो. हे. कॉ. रामकृष्ण पाटील, पो.हे.कॉ. किरण चौधरी, पो.हे.कॉ. मोतीलाल बोरसे, पो.अं. शशिकांत मराठे, पो.अं. रमाकांत साळुंखे यांचे पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.






