आंतर जिल्हा टी – २० वरिष्ठ गटांसाठी मुलांची क्रिकेट चाचणी 

On: September 25, 2026 11:08 AM

जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा टी २० पुरुष क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवडण्यासाठी  निवड चाचणीचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट संघटना तर्फे *रविवार दिनांक २७  सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजता अनुभूती रेसिडेन्शियल शाळेच्या मैदानावर शिरसोली रोड  जळगांव* येथे आयोजित करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन https://forms.gle/Cusk1WaZTgxK7xFq9  गुगल फॉर्म ऑनलाईन भरून  आपला सहभाग नोंदवावा.

तसेच निवड चाचणी साठी क्रिकेट साहित्य रंगीत गणवेश ( Colour Dress ) व शूज ओरिजनल आधार कार्ड सोबत आणावे. सर्व इच्छुक खेळाडूंनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावे असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन यांनी आव्हान केले अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे ( ९४०४९५५२०५ ) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) मोहम्मद फजल ( ७८७५४६३०३२) यांचेशी संपर्क साधावा. सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी आपला फॉर्म ऑनलाइन भरावा. निवड चाचणी फी ₹ १०० कॅश सुरूपात आणावी. ही निवड चाचणी फक्त जळगांव जिल्ह्याच्या खेळाडूंसाठी आहे. इतर जिल्ह्यच्या खेळाडूंना प्रवेश मिळणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment