मयत इसमाच्या वारसांचा शोध लागण्याकामी आवाहन

On: September 25, 2026 7:31 PM

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झालेल्या इसमाच्या वारसांचा शोध लावण्याकामी जळगाव शहर पोलिसांतर्फे आवाहन करण्यात आले आहे. बेशुद्ध अवस्थेत उपचार घेण्याकामी दाखल करण्यात आलेल्या मयत इसमाचे सुनिल हिरामण बारेला असे नाव पुढे आले असले तरी त्याच्या नातेवाईकांचा/वारसांचा शोध लागणे महत्वाचे आहे.

दिनांक 15 सप्टेबरच्य रात्री आठ वाजेच्या सुमारास मन्यारखेडा शिवारात रिलायंस कंपनीच्या समोर साधारण 26 वर्ष वयोगटातील तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याने कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले होते. मन्यारखेडा पोलिस पाटील यांनी तातडीने शासकीय रुग्णवाहिकेतून त्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवानगी केली. उपचारा दरम्यान त्याने आपले नाव सुनिल हिरामण बारेला असे कथन केले होते. इतर माहिती तो बेशुद्ध असल्यामुळे देऊ शकत नव्हता. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.  

वैद्यकीय अधिकारी निखील तायडे यांनी दिलेल्या खबरीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. मयत सुनिल बारेला हा शरीराने सडपातळ असून त्याचे केस लांब व चेह-यावर हलकीशी दाढी आहे. त्याच्या उजव्या हाताच्या पंजावर मागील बाजूस गोलाकार चक्राकृती मंडळ असलेला टॅटू गोंदलेला आहे. त्याची उंची साधारण 5.6” असून रंगाने निमगोरा आहे. मयताची कुणाला काही माहिती असल्यास जळगाव शहर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल प्रविण वाघ (मोबाईल क्रमांक 9765392556 अथवा 02572229693 या लॅंड लाईन क्रमांकावर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment