चोरट्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत

On: September 27, 2026 4:52 PM

जळगाव : मोटार सायकल चोरणा-या चोरट्याकडून त्याने चोरी केलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. तुलसीराम काल्यासिंग कास्दे असे मध्य प्रदेशातील मुळ रहिवासी चोरट्याचे नाव आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. मोटार सायकल चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटकेतील चोरट्यास न्यायालयाने तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील फौजदार चंद्रकांत धनके, ग्रेड.पो.उप.निरी. विजयसिंग पाटील पो.ना.प्रदिप चौधरी, पो.काँ रमाकांत साळुंखे, पो.काँ. शशिकांत मराठे, पोकॉ योगेश घुगे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अधिक तपास पोलिस नाईक प्रदीप चौधरी करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment