मंदिरातील दानपेटी चोरटा रोख रकमेसह ताब्यात

On: September 28, 2026 5:00 PM

जळगाव : जळगाव शहरातील योगेश्वर नगर परिसरातील नर्मदेश्वर महादेव मंदीरातील दानपेटी चोरी करणा-या चोरट्यास त्याच्या कब्जातील 12 हजार 550 रुपयांसह अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शनी पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रीक विश्लेषणासह गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रकांत पाटील (रा. दशरथ नगर जळगाव) अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. एका अल्पवयीन मुलाचा देखील या चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघडकीस आले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास हे.कॉ. अनिल साळुंखे करत आहेत.   

पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या पथकातील परिविक्षाधिन उप निरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोहेकाँ विजय खैरे, योगेश जाधव, अनिल सांळुखे, पोकाँ पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे, पोकाँ नवजित चौधरी व CCTV फुटेज विश्लेषक पोकाँ मुबारक देशमुख आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment