जळगाव : भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात अटकेची भिती दाखवत अटक टाळण्यासाठी हवालदाराच्या नावे विस हजाराची लाच मागणा-या खासगी इसमास जळगाव एसीबी पथकाने अटक केली आहे. अमन हसबिंदर सनसोये असे लाच मागणा-या खासगी इसमाचे नाव आहे. महेश चौधरी या हवालदाराच्या नावे अमन सनसोये या खासगी इसमाने तक्रारदाराकडून विस हजार रुपयांची लाच मागणी केली असल्याचे पडताळणी अंती उघडकीस आले आहे.
भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात मुळ तक्रारदार आणि इतर तीन जण अशा चौघा जणांना हवालदार महेश चौधरी याने अटकेची भिती दाखवली होती. या भितीपोटी चौघा जणांनी प्रत्येकी पंचवीस हजाराप्रमाणे एक लाख रुपयांपैकी पन्नास हजार दिले होते. तडजोडीअंती खासगी इसमाने हवालदाराच्या नावे विस हजार रुपयांची लाच मागणी करत ती स्विकारण्याची संमती दर्शवली.
डिवायएसपी तथा पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकुर तसेच सापळा अधिकारी तथा पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलिस उप निरीक्षक सुरेश पाटील, हवालदार बाळू मराठे, पो.कॉ. प्रणेश ठाकुर, सचिन चाटे, राकेश दुसाने यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. जळगाव शहर व जिल्ह्यातील नागरिकांना लाचेच्या मागणीबाबत तक्रार द्यायची असल्यास 0257-2235477 या लॅंड लाईन क्रमांकावर अथवा 7588661064 या व्हाटस अॅप क्रमांकावर देऊ शकतात.







