खून करुन फरार – चौघे बिहारी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

On: October 1, 2026 5:34 PM

जळगाव – हिमाचल प्रदेशात खून करुन फरार झालेले चौघे संशयीत बिहारी आरोपी जळगाव शनीपेठ पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. शनीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या गुन्हे शोध पथकाने चौघांना जेरबंद केले. हिमाचल प्रदेश पोलिस चौघांच्या मागावर होते. दरम्यान चौघे संशयीत फरार आरोपी जळगावला असल्याची माहिती हिमाचल प्रदेशांना तांत्रीक तपासातून समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्याशी संपर्क साधला. डॉ. जायस्वाल यांनी तातडीने पोलिस अधिक्षकांना माहिती देत पुढील कारवाईला वेग दिला.

चंदन कुमार,  रोशन गोगल मुखिया, संतोष कुमार, अजित कुमार अशी शनीपेठ पोलिसांच्या ताब्यातील चौघा संशयीत बिहार राज्यातील संशयीत आरोपींची नावे आहेत. संतापाच्या भरात चौघांनी मिळून त्यांच्या परिचिताचा खून केला होता. खून करुन चौघांनी मयतास तलावात फेकून देत पलायन केले होते. खूनाची घटनेनंतर चौघे दुस-या दिवशी किसनपुर येथून अंबाला येथे आले. तेथून अमृतसर मुंबई एक्सप्रेस या रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र वाटेत त्यांच्या जवळचे पैसे संपले. भुक सताऊ लागल्याने त्यांनी त्यांच्याकडील मोबाईल विक्री करण्याचे निश्चीत केले. मोबाईल विक्री करण्याच्या प्रयत्नात असतांना शनीपेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने त्यांना जेरबंद केले.

पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या पथकातील फौजदार संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोहेकॉ विजय खैरे, पोहेकॉ योगेश जाधव, पोहेकॉ अनिल साळुंखे, पोकॉ निलेश घुगे, पोकॉ नवजीत चौधरी, पोकॉ अमोल वंजारी, पोकॉ पराग दुसाने, पोकॉ रवींद्र साबळे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment