एक हजाराची लाच घेणारा तलाठी अटकेत

On: October 6, 2026 7:40 PM

जळगाव : अगोदर साडेतीन हजार रुपये लाच घेतल्यानंतर अजून एक हजार रुपयांची लाच मागणी करणा-या आणि स्विकारणा-य तलाठ्याविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. शैलेश अंकुश झोटे असे या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदाराने त्याच्या शेतात सिंचन करण्यासाठी कुपनलिका केली आहे. या कुपनलिकेसाठी शासन नियमानुसार सोलर सिस्टीम बसवण्यासाठी सात बारा उता-यावर कुपनलिका असल्याची नोंद करणे गरजेचे होते. या नोंदीचा सात बारा उतारा देण्यासाठी तलाठी शैलेश झोटे याने तक्रारदारास चार हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी तक्रारदाराने साडे तिन हजार रुपये रोखीने दिले होते.

त्यानंतर तक्रारदार विचारपुस करण्यासाठी गेला असता मागील बाकी पाचशे रुपये आणि नोंदीचा उतारा देण्यासाठी पाचशे रुपये अशा एकुण एक हजार रुपयांची मागणी तलाठी शैलेश झोटे याने केली आणि स्विकारली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment