मोदी मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा ?

भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे. संघटनेत काम करणाऱ्या नेत्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता सरकारमधे नवीन पद देण्याचा निर्णय घेणे सोपे होणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपामध्ये मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. मंत्रीमंडळ विस्तार बिहार निवडणुकीच्य अगोदर होईल किंवा नंतर होईल असे म्हटले जात आहे.

बिहार निवडणुकीची प्रतीक्षा गृहीत धरली तर मंत्रिमंडळाचा विस्तार १० नोव्हेंबरनंतरच होवू शकतो. दुस-या टर्म मधील मोदी सरकारच्या स्थापनेनंतर सोळा महिन्याच्या कालावधीत अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही.

शक्य होईल. ३० मे २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍या कार्यकाळात शपथ घेतली. त्यानंतर १६ महिने झाले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. शनिवारी भाजपाच्या ७० सदस्यीय कार्यकारणीच्या घोषणा झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला आता पेव फुटले आहे. ‘दोन मंत्र्यांनी दिलेले राजीमाने व एका मंत्र्याचे निधन अशा घटना बघता एकुण तिन पदे रिक्त आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here