विना नंबर विना परमीट वाळूचे ट्रक्टर जप्त

जळगाव : विना नंबर व विना परमीटचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर आज एमआयडीसी पोलिस स्टेशनला जप्त करण्यात आले. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व पो.हे.कॉ. जितेंद्र राजपूत असे दोघे जण खासगी वाहनाने पेट्रोलींग करत असतांना त्यांना दगडाने भरलेले ट्रॅक्टर जातांना आढळून आले.

सदर ट्रॅक्टरची पाहणी केली असता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील दगडाखाली वाळू असल्याचे आढळून आले. वाहनचालक गणेश अशोक कुंभार (रा. पाळधी) याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याजवळ ट्रॅक्टरमधील वाळूची रॉयल्टी आढळून आली नाही. सदर ट्रॅक्टर हे सलमान दगडू शेख यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले.
सदर ट्रॅक्टर पुढील कायदेशीर कारवाईकामी सहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला जमा केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here