१५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील ४३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह एकूण १५० वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या बुधवारी रात्री उशिरा झाल्या. यात राज्य राखीव दलातील उपमहानिरीक्षक बी.जे. शेखर यांची नवी मुंबईत गुन्हे अन्वेषण शाखेचे अपर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. मुंबई परिमंडळ एकचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांची नाशिकला उपायुक्त (गुन्हे) पदी बदली करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील विशेष शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांची परिमंडळ एकच्या उपायुक्तपदावर बदली झाली आहे. पुणे एसआरपीएफचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची पुण्यात अप्पर आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी मुंबईचे आयुक्त परमवीर सिंग यांनी ७ उपायुक्तांच्या तात्काळ बदल्या केल्या होत्या. त्या बदल्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आक्षेप आला होता. या बदल्यांमध्ये परिमंडळ एकचे उपायुक्त निशाणदार यांचा देखील समावेश होता. त्यावेळी त्यांना पुन्हा परिमंडळ 1 मध्येच ठेवण्यात आले होते. आज त्यांची नाशिक आयुक्तालयात गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

पोलिसांच्या बदल्यांबाबत ३० सप्टेंबर ही अखेरची मुदत होती. मात्र रात्री उशिरा एकूण १५० अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. अजुन अप्पर महासंचालक, विशेष महानिरीक्षक दर्जाच्या, कनिष्ठ स्तरावरील बदल्या बाकी आहेत. बदलीसाठीचा कालावधी १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

एकूण बदल्यांपैकी १२० अधिकारी हे उपअधीक्षक / सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. यात १५ जणांची सध्याच्या ठिकाणाहून बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. त्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे जारी केले जाणार आहेत.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अधिकाऱ्यांचे नाव सध्याचे ठिकाण नवीन नियुक्तीचे ठिकाण कंसात असून ते पुढीलप्रमाणे आहेत.

सचिन सावंत पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात सहायक पोलीस आयुक्त,नवी मुंबई (प्रमाणपत्र पडताळणी समिती, उस्मानाबाद) धनंजय ह. पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी (भोर विभाग, पुणे), सुहास भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावती (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर), प्रदीप मैराळे उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी, वर्धा. उपविभागीय पोलीस अधिकारी (साक्री, धुळे), प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी, गोंदिया (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर), विवेक सराफ पोलीस उप अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण (सहायक पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर), पोपट रावजी यादव पोलीस उप अधीक्षक, लातूर (सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर), लक्ष्मण भोगण सहायक पोलीस आयुक्त, अमरावती (सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर), बलराज लंजिले उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगाखेड, परभणी (उप विभागीय पोलीस अधिकारी, अहमदपूर, लातूर), पौर्णिमा तावरे उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड, नागपूर (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर), सुरेश पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब, उस्मानाबाद (उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव, जि. बीड), डॉ. शीतल जानवे उप प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय, सांगली (उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई, सातारा), सोमनाथ तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावती (उपविभागीय पोलीस अधिकारी, निफाड, नाशिक़), नंदकिशोर भोसले सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर (सहायक पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड शहर), अभिजित फस्के उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी, जि. सोलापूर), संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर (उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी, जि. यवतमाळ), सचिन हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे (पोलीस उप अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर), विलास सानप पोलीस उप अधीक्षक, अकोला (उप विभागीय पोलीस अधिकारी, मीरा रोड, ठाणे ग्रामीण), गुणाजी सावंत सहायक पोलीस आयुक्त, कॅन्टोंमेंट, औरंगाबाद (सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर), राजेंद्र चव्हाण सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक, नवी मुंबई (सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर), मोहन ठाकूर सहायक संचालक, पोलीस अकादमी, नाशिक़ (सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर), शिवाजी मुळीक उपविभागीय पोलीस अधिकारी, सिंधुदुर्ग (पोलीस उप अधीक्षक, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी), राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई (उपविभागीय पोलीस अधिकारी,दौंड, पुणे), सुनील जायभाय उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकरदन उपविभाग (उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई विभाग), गणेश किंद्रे पोलीस उप अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद (उप विभागीय पोलीस अधिकारी, कोरेगांव, सातारा), रामेश्वर वैंजने उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगोली (उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर, कोल्हापूर), नंदकुमार पिंजण अपर पोलीस उप आयुक्त, पुणे (सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here