राज्यात धार्मिक स्थळे बंदच – तरीही आमदारांचा मंदिर प्रवेश

जळगाव : राज्य शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉक – 5 टप्पा सुरु केला आहे. येत्या 5 ऑक्टोबर पासून राज्यात हॉटेल्स, बार व रेस्टॉरंट सुरु होणार असले तरी देखील अद्याप धार्मिक स्थळे बंदच आहेत.

सर्वत्र मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश असले तरी देखील जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना-रा.कॉ. पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंदिरात प्रवेश करत पुजाअर्चा केल्याची घटना समोर आली आहे.

बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिर शासन नियमानुसार बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या काही निवडक कार्यकर्त्यांना सोबत घेत थेट मंदिरात प्रवेश केला. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे लवकरात लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी त्यांनी पुजाअर्चा देखील केली. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून योग्य ती उपाययोजना केली जात आहे. त्या दृष्टीने राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. बोडवड तालुल्यातील शिरसाळा हनुमान मंदिर आज आ. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी उघडे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here