आगामी १२ आठवड्यांसाठी टीआरपी रेटिंग स्थगित

मुंबई : टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यामुळे “ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल” (बार्क) कडून एक निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तिन महिने टीआरपी रेटिंग स्थगित करण्याचा हा निर्णय “बार्क”ने जाहीर केला आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात टीआरपी मोजणा-या यंत्रणेसोबत छेडखानी करणा-या टोळीच्या माध्यमातून केला जाणारा घोटाळा जनते समोर आणला. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही आणि इतर दोन मराठी वाहिन्यांची नावे समोर आली होती.

प्रेक्षक कोणते कार्यक्रम किती वेळ वेळ बघतात याची माहिती टीआरपीच्या माध्यमातून समजते. या टीआरपीचे मोजमाप बार्क कडून केले जाते. त्याकामी काही प्रेक्षकांच्या घरी एक मीटर बसवलेले असते. ज्या प्रेक्षकांच्या घरात हे मिटर लावले बसवले होते त्यांना काही रक्कम देवून ठराविक चॅनल कायमस्वरुपी दिवसभर बघण्यास सांगण्यात आले होते असे मुंबई पोलिसांच्या लक्षात आले.

रिपब्लिक टीव्हीने जादा टीआरपी पदरात पाडण्यासाठी काहींना पैसे दिल्याचा आरोप मुंबई पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. याबाबत दोन मराठी चॅनलच्या मालकांना अटक करण्यत आली.

या पार्श्वभुमीवर बार्कने पुढील बारा आठवड्यांसाठी हे रेटींग स्थगीत करण्याचा निर्णय घेतला. नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशनकडून बार्कच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. असे असले तरी बार्कने हा निर्णय घेण्यापुर्वी एनबीएशी विचार विनीमय करायला हवा होता असे एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी म्हटले आहे.
टीआरपीमध्ये झालेली वाढ अर्थातच जाहीरातीचे दर वाढवण्याकामी उपयोगी ठरते. आम्ही बार्कच्या संपर्कात असून अधिकची माहिती संकलीत करत असून ती माहीती व प्रसारण मंत्रालयास देणार असल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. बार्क या टीआरपीची मोजदाद करणा-या संस्थेने दिलेल्या तपशीलानुसार रिपब्लिक चॅनलच्या रेटिंग मधे अनोखी वाढ झाल्याचे दिसून आले.

हा प्रकार हंसा नावाच्या संस्थेच्या एका माजी कर्मचाऱ्याला अटक केल्यानंतर ख-या अर्थाने उघडकीस आला. हंसा या कंपनीकडे टी.व्ही.ला बॅरोमिटर लावण्याचे काम देण्यात आले होते. हे बॅरोमिटर लावत असतांना काही माहिती गोपनीय ठेवली जाते.

मात्र, काही ठिकाणी विशिष्ट रक्कम देवून हे बॅरोमिटर लावणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती या हंसा कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांना दिली. तेथून या रॅकेटचा तपास सुरु झाला आणि नंतर पर्दाफाश झाला.

सखोल तपासाअंती त्या माजी कर्मचाऱ्याच्या खात्यात २० लाख रुपये जमा असल्याचे आढळून आले. त्याच्या बॅंक लॉकरमधे साडे आठ लाख रुपये असल्याचे आढळून आले. ही सर्व रक्कम नंतर पोलिसांनी जप्त केली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

ज्या भागात अतिशय गरीब वस्ती आहे आणि तेथील लोक झोपडीत राहतात अशा भागात हे मिटर लावण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी हंसा या कंपनीच्या माजी कर्मचा-यांच्या माहितीच्या आधारे तपास करत हे रॅकेट उघडकीस आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here