शिरपुरच्या दिशेने येणारा ट्रक आदळला पुलाखाली

शिरपूर : मुबंई आग्रा महामार्गावर सांगवी नजीक सेंधवा गावाकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव जाणा-या ट्रकचा (एमएच १८ बिजी ८४९३) शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जोरदार अपघात झाला.

ट्रक चालकास डुलकी लागल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पुलाखाली गेला. या गंभीर अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. सांगवी पोलिस स्टेशनला या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here