अश्लील व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी पुनम पांडेची तक्रार

गोवा : हॉट अ‍ॅंड बोल्ड व्हिडीओ आणि फोटोसेशनमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा चर्चेत आली आहे. गोवा येथील काणकोण पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध तिचा अश्लिल व्हिडीओ शुट केल्याबद्दल तिने तक्रार केली आहे.

तिच्या म्हणण्यानुसार हा अज्ञात व्यक्ती तिचा अश्लील व्हिडीओ शूट करत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुनम पांडे हिने त्या अज्ञाताविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

दरम्यान दुसरीकडे, गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला संघटनेने पूनम पांडे विरोधात तक्रार केली आहे. या महिला संघटनेच्या म्हणण्यानुसार पूनम पांडे चापोली डॅमवर एक अश्लील व्हिडीओ शूट करत होती. तिच्या या व्हिडीओ शुट प्रकरणी या महिला संघटनेचा आक्षेप होता.

पूनमने काही महिन्यापुर्वी तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत विवाह केला आहे. मात्र दोन आठवड्यांच्या आत दोघांचे वाद झाले. हनीमूनला गेले असतांना पूनम पांडेला तिच्या पतीने मारहाण केली. त्यानंतर पूनमने सॅम बॉम्बेच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. सॅमला अटक झाल्यानंतर तो जामीनावर सुटून बाहेर आला होता.

सन २०११ मधे भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर विवस्त्र फोटो सोशल मीडियावर टाकण्याची घोषणा केल्यानंतर पूनम पांडे चर्चेत आली होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here