जळगावात माजी महापौरांच्या मुलाची हत्या

जळगाव : जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (२८) याची धारधार शस्राने हत्या बुधवारी मध्यरात्री झाली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून शिवाजीनगर भागात सतर्कता म्हणून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

जळगाव शहराचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचा चिरंजीव राकेश याचा रात्री बारा वाजेच्या सुमरास शिवाजी नगर भागातील स्मशानभुमीनजीक उस्मानिया पार्क परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी निर्घुण हत्या करण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात धारदार शस्त्र व लोखंडी सळईचा वापर केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच जखमी राकेश यास शहरातील ओम क्रिटीकल येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
सतर्कतेचा भाग म्हणून शिवाजी नगर परिसरात मोठ्य प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असौन मारेक-यांच्या शोधार्थ पथके रवाना झाली असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माजी महापौर सपकाळे यांचा मुलगा राजु याचा गुरुवारी 5 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याच्या तयारीने राकेश त्याचा लहान भाऊ सोनु व वाहन चालक सलमान असे तिघे रात्री त्यांच्या मालकीच्या हॉटेल अशोका येथून शिवाजी नगरच्या दिशेने गेले होते.

शिवाजी नगर स्मशानभूमीजवळ येताच हा जिवघेणा हल्ला व वाहनाची तोडफोड झाली. पुर्ववैमनस्यातून हा खूनाचा प्रकार झाला असल्याचे बोलले जात असून दोघांना प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here