कारमधून रोकड लंपास करणारी टोळी इंदोर येथून ताब्यात

नाशिक : कारमधून रोख रकमेची बॅग घेवून पळ काढणा-या आठ जणांच्या टोळीला मध्यप्रदेशमधील इंदुर येथून गुन्हे शाखा युनीट-१ च्या पथकाने शिताफीने सापळा रचून अटक केले आहे. या टोळीकडून इनोव्हा कार देखील पोलिस पथकाने जप्त केली आहे.

गेल्या महिन्यात सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील एम.जी.रोडवर सेवानिवृत्त उपसंचालक असलेले रामचंद्र जाधव (बोधलेनगर) यांची दिशाभूल करत त्यांच्या कारमधून एक लाख रुपये असलेल्या दोन बॅगा लंपास करत चोरटे पसार झाले होते.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार व त्यांचे सहकारी करत होते. गुन्हे शाखा युनीट-१ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, स.पो.नि. महेश कुलकर्णी यांना या गुन्ह्यातील संशयित आरोपी दिल्ली येथील असल्याची माहिती समजली होती.

या टोळीतील संशयीत दिल्लीहून रविवारी नाशिक शहरात चोरीच्या उद्देशाने येणार असल्याचे समजले होते. नाशीक येथून ही टोळी पुढे एम.पी. त पसार होणार असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार व.पो.नि.आनंदा वाघ यांनी एक पथक इंदुर येथे रवाना केले. इंदुरमध्ये पथक दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तेथील हॉटेल व लॉजेसची झाडाझडती घेतली. महू जिल्ह्यातील बंजारी गावातून संशयित कांगत्रम सैल्ली दुराई, पवन मोहनलाल, आकाश मोहनलाल, मनतोश अली उर्फ मुत्तु, मरियप्पा काली बाबू, विनोद राजेंद्र, साहील सुरेश आणि एक अल्पवयीन अशा आठ जणांच्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला शिताफीने अटक केली.

या टोळीच्या ताब्यातील इनोव्हा कार (एचआर २६ बीआर ९०४४) जप्त करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील सात मोबाईल, दोन मिरची स्प्रे, एक रबरी गलोल, ५० लोखंडी छर्रे तसेच सत्तर हजर रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

अटकेतील टोळीचा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यात वावर असल्याचे उघडकीस आले. या राज्यांतील शहरांमध्ये या टोळीतील सदस्यांविरोधात चोरी, जबरी चोरी, लूटीचे गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊन नंतर या टोळीने आपला मोर्चा नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, इंदुर, अहमदाबाद, दिल्ली या ठिकाणी वळवला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here