नरेश खंडेलवाल यांचे अपघाती निधन

जळगाव : जळगाव येथील प्रथितयश इस्टेट एजंट तथा सामाजिक कार्यकर्ते नरेशजी खंडेलवाल यांचे आज सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी नजीक अपघाती निधन झाले आहे. सुरत येथील कामकाज आटोपून जळगाव येथे परत येत असतांना त्यांच्या वाहनाला ट्रकने दिलेल्या धडकेत ते जबर जखमी झाले होते. मात्र नंतर वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

प्राप्त माहितीनुसार नरेशजी खंडेलवाल त्यांच्या एमएच 19 सीव्ही 6310 या क्रमांकाच्या वाहनाने सुरत येथून जळगावला परत येत होते. दरम्यान नंदुरबार नजीक विसरवाडी तालुक्यातील पानबारा येथे त्यांच्या वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिली . या धडकेत नरेशजी खंडेलवाल यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र विजय जैन, चालक संजय व त्यांचा मित्र असे सर्व जण जखमी झाले. सर्व जखमींना वैद्यकीय उपचारासाठी नंदुरबार येथे आणले गेले.

यात नरेशजी खंडेलवाल यांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. उपचारादरम्यान काही वेळाने त्यांचे दुख:द निधन झाले. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

जळगाव शहरातील ख्यातनाम इस्टेट एजंट असलेले नरेशजी खंडेलवाल यांचे सामाजीक क्षेत्रातील योगदान मोठ्या स्वरुपात होते. साधु संतांना दानधर्म करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. भारतीय नरेंद्र मोदी संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here