हॉट मॉडेल पूनम पांडे व सॅमला अटी शर्थीवर जामीन

मडगाव : पॉर्न व्हिडीओ प्रकरणी अटकेतील हॉट आणि वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे व तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांना अटक करण्यात आली होती. दोघांना काणकोण न्यायालयाने प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त केले. मात्र पुढील 6 दिवस त्यांना काणकोण पोलीस स्टेशनला हजेरी देण्याची अट घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय दोघांना गोवा सोडून जाता येणार नाही.

पूनम आणि सॅम हे दोघे गेल्या महिन्यापासून काणकोण येथेच वास्तव्याला आहेत. दरम्यान त्यांनी हा पोर्न व्हिडीओ शूट केला. या प्रकरणाचा गाजावाजा झाला. त्यानंतर दोघांनी आपले वास्तव्य उत्तर गोव्यात हलवले.

शुक्रवारी काणकोण पोलीस स्टेशनला चौकशीकामी हजेरी देण्याची नोटीस त्यांना देण्यात आली होती. मात्र गुरुवारी सायंकाळीच ते मुंबईला जाण्याची तयारीला लागले होते. या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

अटक केल्यानंतर त्यांनी लागलीचे जामिनासाठी अर्ज केला. काणकोण न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायधिश शानुर अवदी यांनी त्यांना जामीन मंजूर केला.

पूनम पांडे व तिचा पती सॅम बॉम्बे यांच्याविरुद्ध अश्लील व्हिडीओ शूट करणे, सरकारी मालमत्तेत घुसखोरी करणे अशा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या शनिवारी या कथित पॉर्न व्हिडीओची शुटींग करण्यात आली. शुटींगच्या वेळी पूनम व तिचा पती सॅम असे दोघेच तेथे हजर होते. पुनमचा हा व्हिडीओ तिचा पती सॅमने शूट केला होता. व्हिडीओ शूट होत असतांना तेथे साध्या वेषातील दोन पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

घटनास्थळ असलेल्या धरणावर पहाऱ्यासाठी असलेल्या दोघा सुरक्षा रक्षकांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here