बॉलीवुडच्या बड्या हस्तींकडे एनसीबीचे छापे – नावे गुपीत

मुंबई : ड्र्ग्स रॅकेट प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकवेळा कारवाईचे सत्र सुरु केले आहे. बॉलीवुड मधील बडे निर्माते व दिग्दर्शकांकडे एनसीबीने छापेमारी केली आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलीवुड आणि ड्रग्ज यांचे नाते मोठ्या प्रमाणात समोर आले आहे.

काही बड्या सिने कलावंतांवर कारवाई केल्यानंतर एनसीबीने अनेक दिग्दर्शक व निर्मात्यांना टार्गेट केले आहे. असे असले तरी एनसीबीने कोणत्याही निर्माता व दिग्दर्शकाचे नाव उघड केलेले नाही.

मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैरणे अशा पाच परिसरात राहणा-या बॉलीवुड निर्माता, दिग्दर्शकांकडे ही कारवाई केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here