बस वाहकाने संपवली जीवनयात्रा

जळगाव : आर्थिक अडचणीला वैतागून आज सकाळी एस.टी. महामंडळाच्या वाहकाने घरात गळफास घेत आपले जीवन संपवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव बस आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेले मनोज अनिल चौधरी (३०) रा.कुसुंबा) हे गेल्या काही दिवसांपासून पगाराच्या अनियमित्तपणामुळे त्रस्त झाले होते. पगार आधीच कमी आणि तो देखील वेळेवर नाही, अशा अवघड परिस्थितीत त्यांनी आज आपले जीवन संपवले.

गळफास घेण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमिततेला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. या आत्महत्येस एसटी महामंडळाची कार्यपद्धती तसेच ठाकरे सरकार (शिवसेना) जबाबदार असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. घरच्या सदस्यांचा यात काही संबंध नसल्याचे देखील म्हटले आहे.

संघटनांनी माझा पीएफ व एलआयसी परिवारास मिळवून देण्यास प्रयत्न करावा असे त्यांनी म्हटले आहे. संतप्त नातेवाईकांनी महामंडळाचे अधिकारी येऊन आश्वासन देत नाही तोवर मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here