विज बिल भरावेच लागणार – ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : महावितरणकडून विज ग्राहकांना वाढीव विज बिलाचा शॉक देण्यात आला होता. विजबिलात सवलत मिळण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र वापरलेल्या विजेचे बिल भरावे लागेल आणि त्यात माफी मिळणार नसल्याचे ठाकरे सरकारने म्हटले आहे.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी याबाबत म्हटले आहे की वाढीव वीजबिलात सवलत देणे शक्य नसून लॉक डाऊन कालावधीत वापरलेले विज बिल भरावे लागणार आहे. आम्ही देखील विज ग्राहक आहोत. आम्ही कर्ज घेवून मदत करत आहोत. कामकाज चालवतांना आम्हाला मर्यादा येतात.

विज बिलात सवलतीच्या आशेवर बसलेल्या विज ग्राहकांना हा एक शॉक असल्याचे बोलले जात आहे. वाढीव वीजबिलाबाबत अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर हे वीजबिल कमी करण्यासंदर्भातील ऊर्जा विभागाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे गेला होता.

वाढीव वीजबिलात सवलत मिळण्यासाठी केंद्राने राज्याला आर्थिक मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडून पाठवण्यात आला होता. मात्र त्याला देखील अद्याप प्रतिसाद नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here