मुंबई : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पावसाळी अधिवेशन थोडक्यात आटोपण्यात आले. आता कोरोनाच्या संकटामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन देखील दोन दिवसात आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशन 14 व 15 डिसेंबर असे केवळ दोन दिवस चालणार आहे. हे अधिवेशन यावेळी नागपूरऐवजी मुंबईतच होणार आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी विधिमंडळ कामकाज समितीकडून सुरु असतांना आज झालेल्या विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या वेळी विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच व तेदेखील दोनच दिवस होणार आहे.