साईबाबांच्या दर्शनासाठी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नवी नियमावली

saibaba

शिर्डी : सर्वत्र कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी साई संस्थानने काही महत्वाचे बदल करत दर्शनाला मर्यादा घातली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साई संस्थानने केलेले बदल पुढीलप्रमाणे आहेत.

पहाटेच्या काकड आरतीसह रात्रीच्या शेजारतीला कुणाही भाविकाला प्रवेश मिळणार नाही. सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंतच साईबाबांचे दर्शन घेता येईल. ऑफलाईन पास मिळण्याचे काऊंटर गुरुवार, शनीवार, रविवार व सुटीच्या दिवशी बंद राहील. या दिवशी पास हवी असल्यास ती ऑनलाईन घ्यावी लागेल. दिवसभरात केवळ 15 हजार भक्तांनाच प्रवेश व दर्शन मिळेल. गुरुवारी निघणारी साई पालखी बंद राहील. दर्शन रांगेतील दिडशे ते दोनशे भक्तांची कोरोना तपासणी केली जाईल. ऑनलाईन पास घेण्यासाठी www.sai.org.in या वेबसाईटचा वापर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here