आता पुन्हा लढाईचे दिवस – पोलीस महासंचालक

नवी मुंबई : आता विश्रांतीनंतर पुन्हा कोरोनाविरोधी लढाईचे दिवस आले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले आहे. सध्या सुरु असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता रोजचा रुग्णसंख्येचा आकडा सहा हजाराच्या पुढे गेला आहे. त्या पार्श्वभुमीवर बोलतांना नगराळे यांनी कोरोना विरोधी लढाईची घोषणा केली आहे.

रेल्वे सुरु झाल्यामुळे कमी अधिक प्रमाणात रुग्णसंख्या वाढेल असे वाटले होते मात्र एवढ्या प्रमाणात रुग्ण वाढतील असे वाटले नव्हते असे हेमंत नगराळे यांनी पुढे बोलतांना म्हटले. नवी मुंबईसह कोकण परिक्षेत्रात कोरोना कालावधीत शहीद झालेल्या 83 पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नेमणूकीचे पत्र नगराळे यांच्या हस्ते देण्यात आले. वाशी येथील सिडको ऑडीटोरियममधे हे पत्र देण्याचा कार्यक्रम झाला. येत्या काही दिवसात सहायक निरिक्षकांची पोलिस निरिक्षकपदी पदोन्नती होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here