तिरथसिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री

नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यात सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगादरम्यान मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी रा.स्व.संघाचे माजी प्रचारक तथा भाजपचे नेते तिरथसिंह रावत यांची भारतीय जनत पक्षाने उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड केली आहे. धनसिंह रावत, सतपाल महाराज, अजय भट्ट यांच्यासह केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल निशंक हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतांना तिरथसिंह रावत यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस व उत्तराखंडचे माजी शिक्षणमंत्री राहिलेले तिरथसिंह रावत हे सन 1983 ते 88 दरम्यान रा.स्व.संघाचे प्रचारक देखील होते. अ. भा.वि.प. चे राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून देखील रावत यांनी कामकाज पाहिले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here