परभणी एसटी डेपोला एक लाखाचा दंड

लातूर : कोरोनाचा कहर सर्वत्र सुरु असतांना एसटी महामंडळाच्या बसमधे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतुक केल्याप्रकरणी परभणी डेपोला तब्बल एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 22 मार्चपर्यंत हा दंड जमा केला नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिले आहेत.

एमएच 20 बीएल 1922 क्रमांकाची लातुर – जिंतूर ही बस जिंतुरकडे मार्गक्रमण करत असतांना वाटेत या बसची तपासणी करण्यात आली. जिंतुरचे उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सखाराम मांडवगडे, आणि नगरपरिषदेचे अधिकारी यांच्या पथकाने या बसची तपासणी केली. या बसमधे 44 प्रवाशांसाठी आसन व्यवस्था असतांना 81 प्रवासी आढळून आले. तसेच एक कुत्र्याचे पिल्लू देखील एका प्रवाशाने सोबत घेतले होते. एकाही प्रवाशाने मास्क, सॅनीटायझर व सोशल डिस्टन्सचे पालन केलेले नव्हते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आपल्या आदेशात म्हटले होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here